नौकासन

आसन :पूर्वस्थिती -विपरीत शयनस्थिती

१)दोन्ही हात खांद्याच्या वरून डोक्याकडे सरळ नेऊन जमिनीवर टेका .दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जुळवून ठेवा .नमस्कार करताना जसे हात जोडले जातात तसे हात जोडलेले ठेवा .कपाळ जमिनीवर टेकवा .

२)श्वास घेत घेत पुढून हात व मान आणि मागून पाय सरळ ताणून सावकाश वर उचला .हात व पाय जास्तीत जास्त वर उचलून तशाच अवस्थेत स्थिर राहा आणि श्वसन संथपणे चालू ठेवा .

या उलट दिशेने आसन  सोडणे .

वेळ:

फायदे :

हात,खांदे,मांड्या  व पाय स्वतंत्रपणे वर उचलले जातात .त्यामुळे ते कमी उचलले गेले तरी ताण जास्त येतो व हा ताण आसन स्थिर ठेवल्यानंतर अधिक प्रमाणात आंतरेंद्रियांपर्यंत पोहचतो व त्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.

काळजी :

या आसनात शरीराचा सर्व भार पोटावर येत असल्याने या ताणाचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी .पोटाचे विकार असणाऱ्यांनी करू नये.

नौकासन
Click image to enlarge