हलासन

आसन :  पूर्वस्थिती -शयनस्थिती

१) श्वास घेत घेत दोन्ही पाय वर उचलून जमिनीशी काटकोनात ठेवा आणि द्विपाद उत्तानपादासनाची अवस्था घ्या

२)श्वास सोडत सोडत कमर वर उचला व पाय डोक्यावरून मागे नेऊन तरंगते ठेवा व तोल व्यवस्थित सांभाळा

३)श्वास पूर्ण सोडला गेल्यावर पाय खाली नेऊन दोन्ही पायांचे अंगठे जमिनीवर टेकवा चवडे ताणलेले ठेवा व श्वसन संथपणे चालू ठेवा

या उलट दिशेने आसन  सोडणे .

वेळ:

फायदे:

या आसनामुळे पाठीच्या काण्याची जास्तीत जास्त घडी होत असल्याने संपूर्ण कणा उत्तम प्रकारे ताणाला जातो सर्वांगासनाप्रमाणे याही आसनात जालंधर बंध बांधला जातो .पोटातील स्नायू व पोटातील इंद्रिये यांचीही कार्यक्षमता वाढविण्यास या आसनाचा उपयोग होतो .या आसनाच्या अभ्यासाने पचनाच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते .

काळजी :

या आसनात पाठीच्या कण्यावर खूप ताण येत असल्याने त्याचा अभयास सावकाश व हळू हळू करावा.

हलासन
Click image to enlarge