अर्धचक्रासन

आसन : पूर्वस्थिती -शयनस्थिती

१)दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून शरीराजवळ आणा.दोन्ही पायांचे तळवे जमिनीला टेकलेलेच ठेवा .दोन्ही पाय एकमेकांस जुळलेले असू द्या आणि त्या अवस्थेत टाचा दोन्ही बैठकीला चिकटून घ्या.

२)दोन्ही हातांची डोक्याच्या  पलीकडे घडी घालून स्वतिक बंध बांधा .

३)श्वास सोडा . श्वास घेत कंबर वर उचला आणि गुडघ्यापासून खांद्यापर्यंत सर्व शरीर सरळ रेषेत येऊ द्या . दोन्ही हाताचा बांधलेला स्वस्तिक बंध आणि दोन्ही पायांचे चवडे जमिनीवर पूर्णपणे टेकलेले ठेवा .दोन्ही गुडघे एकमेकास जुळलेले असू द्या .

४)डावा पाय जमिनीवरून उचलून गुडघ्यामध्ये सरळ करा. चवडा पुढच्या दिशेने ताणलेला ठेवा .

५)उजव्या पायाची टाच वर उचला आणि तोल व्यवस्थित सांभाळून आसनामध्ये स्थिर राहा . श्वासोश्वास संथपणे चालू ठेवा .

या उलट दिशेने आसन  सोडणे .

वेळ:

फायदे :

कंबरेच्या हाडांचे सांधे आणि त्या आजूबाजूला असणारे सर्व स्नायू यांच्यावर चांगला परिणाम होतो. व पोटरीचे आणि मांड्याचे स्नायू यांच्यावर काही प्रमाणात ताण येतो . मुख्यतः कंबर स्पॉडिलायटिस या विकाराच्या रुग्णांना या आसनाचा फायदा होतो.

काळजी :

हृदयविकार,रक्तदाब ,मेंदूचे विकार असणाऱ्यांनी हे आसन करू नये ,तसेच कंबरेच्या सांध्याचे व पाठीच्या कण्याच्या कंबरेतील मणक्याचे काही विकार असतील त्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हे आसन करावे .

अर्धचक्रासन
Click image to enlarge