पर्वतासन

आसन: पूर्वस्थिती पद्मासनस्थिती

१)दोन्ही हात खांद्याच्या पातळीत समोर उचलून त्यांची बोटे एकमेकांत अडकवा .हातांची बोटे पंजाच्या बाहेरील बाजूस राहू द्या.

२)बोटे एकेमकांत अडकलेल्या स्थितीत हात डोक्यावर न्या . मनगटात फिरवून हाताचे तळवे ऊर्ध्व दिशेला करून हाताच्या आधाराने संपूर्ण शरीर वरच्या दिशेने ताणून द्या .संथ श्वसन करीत स्थिर राहा .

या उलट दिशेने आसन  सोडणे .

वेळ:

फायदे:

या आसनात हात,पाठ,पोट वगैरे स्नायू ताणले गेल्याने त्यांची कार्यक्षमता तर वाढतेच ,परंतु पाठीचा कणा ही ताणला गेल्याने त्याची लवचिकता व कार्यक्षमता वाढते शिवाय पाठीच्या कण्याचे काही विकार बरे होण्यास या आसनाचा उपयोग होतो.

काळजी:

हे आसन सोपे असल्याने विशेष काळजी घेण्यासारखे यात काही नाही .

पर्वतासन
Click image to enlarge