धनुरासन

आसन :पूर्वस्थिती -विपरीत शयनस्थिती

१)दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा आणि दोन्ही गुडघे साधारणतः ६ ते ८ इंच दूर करून ठेवा .

२)दोन्ही हातांनी दोन्ही पाय मागे घोट्याजवळ घट्ट पकडा .

३)श्वास सोडा व श्वास घेत घेत हातांनी व पायांनी हात ओढून वर उचला व संपूर्ण शरीर ताणले जाऊ द्या . पाय वर उचलताना पोटऱ्या मांड्यापासून लांब नेण्याचा प्रयत्न करा .मान उचलून मागच्या दिशेने वळवा .श्वसन संथपणे चालू ठेऊन त्याच अवस्थेत स्थिर राहा .

या उलट दिशेने आसन  सोडणे .

वेळ:

फायदे :

या आसनात शरीरातील ताण पाठीचा कणा ,मांड्या ,पाय वगैरे सर्व अवयवात विभागले जातात .प्रामुख्याने पोटाचे व ओटीपोटाचे स्नायू चांगल्या तऱ्हेने ताणले जातात .तेथून तो दाब पोटातील इंद्रियांपर्यंत पोहचविला जातो व पाचक रस निर्माण करणाऱ्या ग्रंथी ,यकृत ,स्वादुपिंड यावर परिणाम होऊन कार्यक्षमता वाढण्यास मदत होते .

काळजी :

पाठीच्या कण्याचे विकार ,हर्निया,आतड्यांचा क्षयरोग आंत्रव्रण यासारखे पोटाचे विकार असणाऱ्यांनी करू नये .

धनुरासन
Click image to enlarge