विपरित करणी

विपरीत करणी- पूर्वस्थिती -शयनस्थिती

आसन :

१)श्वास घेत दोन्ही पाय सरळ वर उचलणे

२) श्वास सोडत कमर वर उचलणे  व दोन्ही पाय डोक्यावरून खाली तोल राहील इतपत मागे न्या .

३) श्वास घेत दोन्ही हातांनी कमरेला आधार देऊन दोन्ही पाय सरळ वर उभे करून जमिनीशी  लंब अवस्थेत आणणे .चवडे वर आकाशाकडे ताणून द्रुष्टी पायाच्या अंगठ्याकडे स्थिर ठेवा.

या उलट दिशेनेच आसन सोडणे .

वेळ : १ ते ३ मिनिटे

फायदे :

गुरुत्वाकर्षणामुळे पायाकडील रक्तपुरवठा हृदयाकडे वाहण्यास मदत होते.

कमरेचे ,पाठीचे विकार होत नाही .

कोणी  करू नये :

हृदयविकार ,उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी करू नये.

विपरित करणी
Click image to enlarge