ताडासन

आसन :

१)डावा पाय डावीकडे टाका .दोन्ही पावलात एक फूटभर अंतर ठेवा .

२)दोन्ही हात समोरून वर उचला व खांद्याच्या रेषेत ठेवून बोटे एकमेकांत अडकवा .बोटे बाहेरच्या दिशेने ठेवा .

३)बोटे अडकवलेल्या स्थितीत दोन्ही हात डोक्याच्यावर न्या व पंजे उलटे करा म्हणजे तळवे छताच्या दिशेने व बोटे आतल्या दिशेने राहतील .दंड काना जवळ असू द्या .

४)श्वास घेत घेत टाचा वर उचलून संपूर्ण शरीर वरच्या दिशेने ताणून घ्या .दोन्ही हातांच्या सहाय्याने हा ताण वाढवण्याचा प्रयत्न करा .श्वसन अर्थातच संथपणे चालू ठेवा.

या उलट दिशेने आसन  सोडणे .

वेळ:

फायदे :

सर्व शरीर पर्यायाने सर्व स्नायू वरच्या दिशेने ताणले गेल्यामुळे सर्व स्नायूंचा रक्त पुरवठा सुधारतो व त्यांची कार्यक्षमता वाढते .सर्व स्नायू एकाच दिशेने भरपूर ताणले गेल्यामुळे त्यांच्यातील अनियमितता नाहीशी होऊन त्या सर्वांत सुसंगती निर्माण होते .पचन उत्सर्जन सुधारायला या आसनाचा उपयोग होतो .सर्व ताण निघून स्नायू हलके झाल्यासारखे वाटतात .

काळजी :

हे आसन प्रारंभी फार काळ स्थिर ठेवता येत नाही कारण तोल सांभाळणे अवघड असते.