शिर्षासन

आसन :

१)चवड्यांवर बसा

२)हातांची बोटे बाहेर राहतील अशा पद्धतीने एकमेकात अडकवा .दोन्ही कोपरापासून पुढचे हात जमिनीवर समोर टेकवा . कोपरात ३० से .मी . अंतर ठेवा . पुढे वाकून त्या तळव्यांच्या मध्ये डोके जमिनीवर टेकवा.टाळू जमिनीवर टेकेल अशा पद्धतीने डोके व्यवस्थित ठेवा .

३)पाय गुडघ्यात सरळ करा .

४)पाय गुडघ्यात सरळ ठेऊनच चवडे हळुंहळू डोक्याजवळ आणा . पाठ ,मान डोके एका रेषेत व जमिनिला लंब अवस्थेत आणून ठेवा .

५)तोल सांभाळून सावकाश पाय वर उचला व गुडघ्यात वाकवा .

६)कंबरेत सरळ ठेऊन घडी घातलेले पाय मागच्या दिशेने न्या .

७)दोन्ही पाय गुडघ्यात सरळ करून चवडे वर ताणा व आसन पूर्ण करा .

या उलट दिशेने आसन  सोडणे .

वेळ:

फायदे :

शिर्षासनात पाय वर,डोके खाली केले जाते त्यामुळे पायांना रक्तपुरवठा करताना तो गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध दिशेने करावा लागतो . त्याकरीता हृदयाला अधिक श्रम पडतात . उलट प्रक्रियेमुळे श्रम कमी व रक्तपुरवठा जास्त होतो . डोळ्यांना भरपूर रक्तपुरवठा झाल्यामुळे चष्म्याचा नंबर कमी होतो. टक्कल पडलेले असेल तर केस येतात .

काळजी:

हे आसन करताना चादरींची व सतरंजीची जाडसर घडी डोक्याखाली घेणे तसेच हृदयविकार ,रक्तदाब ,मेंदूचे विकार ,डोळ्यांचे ,कानांचे विकार ,दमा वगैरें यासारकंखे विकार असणाऱ्यांनी हे आसन करू नये.

शिर्षासन
Click image to enlarge