शलभासन

आसन :पूर्वस्थिती -विपरीत शयनस्थिती

१) श्वास घेत घेत डावा पाय गुडघ्यात न वाकवता सरळ ठेवून कमरेपासून सावकाश वर उचला ,पायाचे चवडे मागच्या दिशेने ताणून घ्या व श्वसन संथपणे सुरु ठेवा .

या उलट दिशेनेच आसन सोडणे                                    

वेळ:

फायदे :

या आसानातील ताण प्रामुख्याने पाठीच्या कण्यातील शेवटचे काही मणके,ओटीपोटाचे स्नायू व मांड्यातील स्नायू यावर येतात . त्यामुळे तेथील रक्तभिसरण वाढून त्यांची कार्यक्षमता वाढते . या ताणांचे परिणाम लहान व मोठे आतडे आणि तदनुषंगिक रसोत्पादक ग्रंथीवर अनुकूल होऊन त्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते .

काळजी :

पाठीच्या कण्याचे विकार ,हर्निया ,आतड्यांचा क्षयरोग ,आंत्रव्रण यासारखे पोटाचे विकार असणाऱ्यांनी या आसनाचा अभ्यास करू नये .

शलभासन
Click image to enlarge