पद्मासन

आसन: पूर्वस्थिती- बैठकस्थिती

१) दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता एकमेकांपासून दूर करा. दोन्ही पावलात सुमारे एक ते दिड फूट अंतर ठेवा. 
२) उजवा पाय गुडघ्यात वाकवून त्या पायाचा चवडा डाव्या मांडीवर ठेवा .उजव्या पायाची टाच डाव्या जांघेवर ठेवा. 
३) डावा पाय गुडघ्यात वाकवून त्या पायाचा चवडा उजव्या मांडीवर ठेवा.डाव्या पायाची टाच उजव्या जांघेवर येऊ द्या. 
४) दोन्ही हात गुडघ्यावर टेकवून ज्ञानमुद्रा करा.संथपणे श्वसन चालू द्या. 
       या उलट दिशेनेच आसन सोडणे. 
वेळ:


फायदे:-

या आसनाचा उपयोग शरीराप्रमाणेच मनाच्या स्थिरते करताही होत असल्याने याचा उपयोग मुख्यतः ध्यानधारणेच्या व प्राणायामाच्या अभ्यासाकरिता केला जातो. 
 
काळजी:-

बऱ्याचवेळी पद्मासनात जालंधर बंध व मूलबंध करावयाला सांगितले जाते.या बंधाचा नीट अभ्यास असल्याशिवाय पद्मासनात हे करू नये.  

पद्मासन
Click image to enlarge