उग्रासन

आसन :

१)डावा पाय डावीकडे व उजवा उजवीकडे सरकवा . दोन्ही पायात तीन साडेतीन फूट अंतर ठेवा .

२)श्वास सोडून कंबरेत खाली वाका व दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर पूर्णपणे टेकवा .

३)कंबरेत आणखी खाली वाकून टाळू जमिनीवर टेकवा . यावेळी दोन्ही हात कोपरात वाकतील . दोन्ही हातांच्या आधाराने शरीराचा तोल सांभाळा .

४)शरीराचा तोल दोन्ही पाय व टाळू यावर नीट सांभाळून डाव्या हाताने डाव्या पायाचा तळवा पकडा व उजव्या हाताने उजव्या पायाचा तळवा पकडा .श्वसन संथपणे चालू ठेवा .

या उलट दिशेने आसन  सोडणे .

वेळ:

 

फायदे:

या आसनात सांध्याची जेवढी हालचाल होणे शक्य आहे तेवढी केल्यामुळे तेथील मलसंचय कमी होतो व त्या सांध्याची कार्यक्षमता सुधारते .टाळू जमिनीवर टेकतांना डोके खाली जाते व मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो .पचन संस्थेची इंद्रिये ,पचनाची महत्वाची इंद्रिये यावर ताण आल्यामुळे तेथील  ग्रंथीचे स्त्राव चांगल्या प्रकारे स्त्रवू लागतात .

काळजी:

मेंदूचे विकार,डोक्याचे विकार,हृदयाचे विकार असणाऱ्यांनी व स्पॉडिलायटिसच्या रुग्णांनी हे आसन करू नये .

उग्रासन
Click image to enlarge