मत्स्यासन
असन : पूर्वस्थिती -शयनस्थिती
१)दोन्ही पाय साधारणतः एक फूटभर दूर करा
२)डावा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या मांडीवर ठेवा .
३)उजवा पाय गुडघ्यात वाकवून डाव्या मांडीवर ठेवा .
४)कोपऱ्यांच्या आधाराने खांदे व डोके वर उचला .मान मागे वाळवून टाळू डोक्याचा वरचा भाग जमिनीला टेकवा .
५) दोन्ही हातानी विरुद्ध पायांचे अंगठे पकडा व श्वसन संथपणे चालू ठेवा .
या उलट दिशेने आसन सोडणे .
वेळ:
फायदे :
जालंधर बांधत ज्या ग्रंथीवर दाब येतो त्या ग्रंथी या आसनात ताणल्या जातात .याशिवाय मांड्यात शिरा व पोटाचे स्नायूपण पद्धतशीरपणे ताणले गेल्याने त्यांची कार्यक्षमता वाढते .डोक्याच्या व टाळूच्या विशिष्ट अवस्थेमुळे मेंदूचा रक्तपुरवठाही अधिक चांगल्या प्रमाणात होतो.
काळजी:
मानेचे स्नायू दुखावण्याचा संभव आहे