शवासन
आसन :पूर्वस्थिती शयनस्थिती
१)दोन्ही पाय एकमेकांपासून सव्वा ते दीड फूट दूर करा . टाचा आतील बाजूस व चवडे बाहेरील बाजूस करून ढिले सोडा .
२)दोन्ही हात शरीरापासून ३ ते ४ इंच दूर करून ढिले सोडा . तळवे वरच्या दिशेला येतील असे ठेऊन बोटे अर्धोन्मीलित अवस्थेत ठेवा .
३)मान सोईस्कर अशा दिशेला वळवून ढिली सोडा .अशा अवस्थेत विश्रांती कारक व सुखकारक वाटेल अशा दिशेला डोके ठेऊन चेहऱ्याचे स्नायू ढिले सोडा व डोळे सहजपणे मिटून घ्या.श्वसन शक्य तितके मंदपणे चालू ठेवा .
या उलट दिशेने आसन सोडणे .
वेळ:
फायदे : अवयवांना लागणारा रक्ताचा पुरवठा कमी केला जातो व श्वसनाची गती मंद होऊन संपूर्ण शरीराला आराम मिळतो .
काळजी :
हे आसन विश्रांती कारक असल्याने विशेष काळजी घेण्यासारखे यात काही नाही . मात्र हे आसन करताना झोप येणार नाही एवढी काळजी न विसरता घ्यावी .