भुजंगासन

आसन :पूर्वस्थिती -विपरीत शयनस्थिती

१)दोन्ही हात छातीशेजारी टेका.तळवे जमिनीवर टेकून बोटे पुढच्या दिशेला पण एकमेकांना चिटकलेली ठेवा व हातांचे अंगठे जास्तीत जास्त बाजूला ताणून घ्या .दोन्ही हातांची कोपरे वर आकाशाच्या दिशने सरळ उभी ठेवा . कपाळ जमिनीवर टेकवा आणि श्वास सोडा .

२)श्वास घेत प्रथम कपाळ  व हनुवटी वर उचला . मान मागच्या दिशेने जास्तीत जास्त वाकवा . नंतर सावकाशपणे खांदे वर उचलण्यास सुरुवात करा . पाठीच्या एका एका मणक्यात क्रमाक्रमाने ताण घेऊन छाती वर उचला .दोन्ही हात कोपऱ्यात सरळ होईपर्यंत छाती वर उचला व मान जास्तीत जास्त मागे टाकून स्थिर ठेवा . हि अवस्था पूर्ण झाल्यावर श्वसन संथपणे सुरु ठेवा .

या उलट दिशेने आसन  सोडणे .

वेळ:

फायदे :

पोटाचे स्नायू ताणले जातात त्यामुळे पचनेंद्रियांवर चांगले परिणाम करतात .पाठीच्या कण्याची मागे वाकण्याची हालचाल झाल्याने स्नायू अधिक लवचिक बनतात .पाठ दुखीवर अतिशय उपयुक्त आसन आहे .पाठीच्या कण्याशी संबंधित असलेल्या स्नायूंमधील रक्ताभिसरण सुधारते व ते अधिक कार्यक्षम होतात .

काळजी :

पाठीच्या कण्याचे विकार ,हर्निया आतड्यांचा क्षयरोग आंत्रव्रण यासारखे पोटाचे विकार असणाऱ्यांनी या आसनाचा अभ्यास करू नये.

भुजंगासन
Click image to enlarge