मकरासन
आसन : पूर्वस्थिती -विपरीत शयनस्थिती
१)दोन्ही हातांची घडी कपाळाखाली आणून आपले कपाळ त्यावर सोईस्कर रीतीने ठेऊन मान ढिली सोडा .
२)दोन्ही पाय एकमेकांना साधारणतः एक फूटभर दूर करून टाचा आतील बाजूला व चवडे बाहेरच्या दिशेला वळवून पाय ढिले टाका .
३)शरीर पूर्णपणे ढिले सोडा . शरीराचा जास्तीत जास्त भाग जमिनीवर टेकवून संथपणे श्वसन चालू ठेवा डोक्याची अवस्था जशी सोईस्कर वाटेल तशी ठेवा .
या उलट दिशेने आसन सोडणे .
वेळ:
फायदे:
या आसनात सर्व स्नायू ढिले केल्यामुळे त्यांना लागणारा रक्तपुरवठा ,प्राणवायूचा पुरवठा साहजिकच कमी वाटतो . त्यामुळे हृदयाची स्पंदनक्रिया संथ होऊ लागते . व परिणामतः श्वसनाची गतीही अधिक संथ होते . म्हणजे शरीरातील या मूलभूत प्रक्रिया संथ झाल्याने शरीराला चांगल्या प्रकारे विश्रांती मिळते .
काळजी:
या आसनात शरीर ढिले पडल्याने झोप लागण्याकडे प्रवृत्ती होते . ती मात्र कटाक्षाने टाळली पाहिजे .