त्रिकोणासन

आसन :

१)डावा पाय उचलून जास्तीत जास्त डावीकडे नेऊन ठेवा .

२)डाव्या पायाचा चवडा डावीकडे वळवा व श्वास घ्या .

३)श्वास सोडून डावा गुडघा वाकवा व डाव्या हाताचा तळवा डाव्या पायाच्या चवड्या शेजारी पाठीच्या बाजुने पूर्णपणे जमिनीवर टेकवून ठेवा .

४)उजवा हात उजव्या कानावरून सरळ पुढे न्या  व श्वसन संथपणे चालू ठेवा .

या उलट दिशेने आसन  सोडणे .

वेळ:

फायदे:

या आसनात शरीराचा भाग पायाच्या पोटऱ्या ,मांड्या आणि खाली टेकवलेल्या हाताचे स्नायू यावर येत असल्याने चांगला परिणाम होतो . सर्व शरीर एकाच दिशेने ताणले गेल्याने त्याचा त्या स्नायूंवर चांगला परिणाम होऊन कार्यक्षमता वाढते . कमरेच्या सांध्यातील विकृतींवर या आसनाचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो .

काळजी:

पाठीच्या कण्याचे व कमरेचे विकार असणाऱ्यांनी याचा अभ्यास करण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे .