अर्धमत्स्येन्द्रासन
आसन : पूर्वस्थिती- बैठकस्थिती
१)डावा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या गुडघ्याच्या पलीकडे डाव्या पायाची टाच येईल अशा पद्धतीने जमिनीवर ठेवा .
२)उजव्या पायाची घडी करून मांडी घातल्याप्रमाणे तो पाय ठेवा .
३)उजव्या हाताने डाव्या गुडघ्याला तिढा देऊन डाव्या पायाचा अंगठा पकडा .
४)खांदे व मान जास्तीत जास्त डावीकडे वळवा .डावा हात डाव्या बाजूने मागून कमरेभोवती फिरवून तळवा बाहेर राहील अशा तह्रेने ठेवा .दृष्टी डावीकडून मागच्या दिशेने फिरवून स्थिर ठेवा . श्वसन संथपणे चालू ठेवा .
या उलट दिशेने आसन सोडणे .
वेळ:
फायदे:
बद्धकोष्ठता व अग्निमांद्य यासारख्या पचनाच्या विकारावर या आसनाचा अनुकूल परिणाम होतो.