पाश्चिमोतानासन
आसन :पूर्वस्थिती- बैठकस्थिती
१)फक्त श्वास घ्या .
२)श्वास सोडून दोन्ही हातांनी पायांचे अंगठे पकडा .
३)श्वास सोडलेल्या अवस्थेत खाली वाका व कपाळ गुडघ्यावर ठेवा. श्वसन संथपणे चालू ठेवा .
या उलट दिशेने आसन सोडणे .
वेळ:
फायदे:
या प्रकारच्या शरीराच्या हालचालीमुळे पायाच्या टाचांपासून मानेतील शिरांपर्यंतच्या सर्व नाड्या ताणल्या जातात व त्या सर्वांची शुद्धी होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते . व पूर्व भागाचे स्नायू आकुंचन पावलेले असल्याने त्यांचा दाब फुफ्फुसे ,पोटातील इंद्रिये व अंतः स्त्रावी ग्रंथी यांचेवर येतो व त्यांची कार्यक्षमता वाढते .
काळजी:
पाठीच्या कण्याचे काही विकार असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय याचा अभ्यास करू नये.