पवन मुक्तासन
आसन :पूर्वस्थिती -शयनस्थिती
१) श्वास घेत दोन्ही पाय वर उचलून द्विपाद उत्तानपादासनाच्या अवस्थेत या .
२)दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून त्यांची घडी करून पोटावर ठेवा . दोन्ही पायांचे गुडघे व चवडे एकमेकांना जुळवून ठेवा .
३)दोन्ही हातांनी पायांना घट्ट मिठी मारा व पायांच्या आधाराने पोट दाबून ठेवा .
४)मान वाकवून डोके वर उचला व हनुवटी दोन गुडघ्यांच्या मध्ये दाबून बसवा .संथ श्वसन करीत स्थिर राहा .
या उलट दिशेने आसन सोडणे .
वेळ :
फायदे :पोटावर पद्धतशीर व चांगला दाब आल्याने मोठ्या आतड्यातील वायू गुददवाराच्या मार्गाने बाहेर पडतो .यामुळे पचनक्रिया सुधारते व शौचाला साफ होते .
काळजी:
पोटातील शस्त्रक्रिया,हर्निया या अन्य पचनाचे विकार मूळव्याध असणाऱ्यांनी तज्ञांचा सल्ल्याशिवाय करू नये . तसेच गर्भवती महिलांनी याचा अभ्यास करू नये .