सर्वांगासन

सर्वांगासन:    पूर्वस्थिती -शयनस्थिती

१) श्वास घेत दोन्ही पाय सरळ वर उचलणे ,जमिनीशी काटकोनात ठेवणे

२)श्वास सोडत सोडत कंबर वर उचला व पाय डोक्याच्या दिशेने मागे न्या

३)श्वास घेत पाठ आणखी वर उचला ,दोन्ही पाय सरळ करून पाठही त्या रेषेत सरळ करा .दोन्ही हातांच्या पंजांनी बरगडीजवळ आधार देऊन पाय ,कमर, पाठ एका सरळ आणि जमिनीशी लंब रेषेत स्थिर करा . द्रुष्टी पायांच्या अंगठ्याकडे स्थिर करून श्वसन संथपणे चालू ठेवा .

या उलट दिशेने आसन सोडावे.

वेळ:

फायदे :मानेतील जालंधर बंध या आसनात बांधला जातो .या बंधामुळे विशेषतः थायरॉईड व काही प्रमाणात पिट्युटरी या दोन महत्वाच्या अंतः स्रावी ग्रंथीवर दाब येतो .व त्यांची कार्यक्षमता वाढवली जाते .स्त्री पुरुषांच्या जनन संस्थेतील विकार यावर या आसनाच्या अभ्यासाचा चांगला परिणाम होतो .याशिवाय अग्निमांद्य, बद्धकोष्टता ,हर्निया हे विकार देखील बरे होतात .

कोणी करू नये:

डोकेदुखी ,मेंदूचे विकार,रक्तदाब असणाऱ्यांनी या आसनाचा अभ्यास करू नये

सर्वांगासन
Click image to enlarge