अहिंसा ,सत्य,अस्तेय,ब्रह्मचर्य व अपरिग्रहहे पाच यम आहेत.

अहिंसा:

हिंसा न करणे म्हणजे अहिंसा ,हिंसेतून दुःखाची निर्मिती होते .म्हणून कोणालाही दुःख न देणे म्हणजे अहिंसा.अहिंसा पाळावयाची ठरल्यास त्या दिशेने विचार मनात ठेऊन कायिक ,वाचिक व मानसिक यापैकी कोणत्या प्रकारची हिंसा आपल्याकडून होते याचा नीट विचार केला तर असे लक्षात येते कि ,कित्येकदा आपण काही कारण नसताना अशा प्रकारची हिंसा करत असतो. हि हिंसा न करणे आपल्याला सहज शक्य असते. अशा प्रकारची हिंसा न करण्याची मनाला व शरीराला सवय लागल्यामुळे पुढेपुढे अशा प्रकारची हिंसा टाळता येते व हळूहळू सर्वार्थाने अहिंसा पलायन करणे शक्य होते.


सत्य :
सत्य म्हणजे खरे एव्हडा मर्यादित अर्थ यात अंतर्भूत नाही ,जसे पाहिले असेल ,असे अनुभवाने जाणले असेल ,जसे ऐकले असेल त्याप्रमाणे वणीची व मनाची प्रवृत्ती असू देणे म्हणजे सत्यपालन. सातत्याची श्रेठतेनुसार प्रतवारी सांगताना महाभारतात मोक्षपर्वामध्ये मौन श्रेष्ठ ,मौनापेक्षा सत्य भाषण करणे श्रेष्ठ ,त्या पेक्षा श्रेष्ठ जे सत्य भाषण करावयाचे असेल ते धर्मयुक्त असणे ,सत्याचे आचरण करणाऱ्या अभावाने सत्याची सिद्धी झाली असता वाचासिद्धी प्राप्त होते.

अस्तेय:
स्तेय म्हणजे चोरी ,अस्तेय म्हणजे चोरी न करणे .जी गोष्ट व वस्तू आपली नाही ती न घेणे म्हणजे अस्तेय .चोरी या ताणाचे शरीरावर व अंतःस्रावी ग्रंथीवर दुष्परिणाम होतात. अस्तेयाचे पालन केले तर हा मानसिक त्रासाचा सर्व प्रपंच निर्माण होती नाही.

ब्रह्मचर्य :
धर्म व शास्र यांनी घालून दिलेल्या मर्यादेत राहून सीमित स्वरूपाचा विषयोपभोग घेणे म्हणजे ब्रह्मचर्य होय . स्वैराचारी वागण्याने आपण उलट अधिकाधिक बंधनात पडत असतो. संसारी जीवनात विषयोपभोगांना विशिष्ट स्टॅन आहे हे निश्चित ,पण हि मर्यादा समजली नाही तर मात्र आपण त्यांच्या ताब्यात जातो व आपले स्वातंत्र्य नष्ट होते. त्यांची पूर्तता झाली नाही कि मानसिक व शारीरिक स्वास्थ्य नष्ट करतात. जो ब्रह्मचर्य पालन करतो त्याला विलक्षण तेज प्राप्त होते.

अपरिग्रह:

आपणाला जेव्हडे कमीत कमी आवश्यक आहे त्याचा तेव्हडाच मर्यादेपर्यंत उपबघोग घेणे योग्य आहे. त्यांचा संग्रह करणे म्हणजेच अपरिग्रह होय. आपल्या जरुरीपेक्षा अधिक गोष्टीचा मोह न धरता त्यामागे न फिरणे म्हणजे परिग्रहाचे पालन होय .

Today's Health Tip