समाधी - पतंजलीनी अष्टांग योगाचे हे अंतिम ध्येय सांगितले आहे. धारणेतुन ध्यान, ध्यानातुन पुढे समाधी, समाधी ही ध्यानाची प्रगत अवस्था आहे.
समाधी दोन प्रकारची असते निर्बीज व सबीज.
निर्बीज समाधी - निर्बीज म्हणजे बिजविरहीत. बीज म्हणजे शरीर. शरीरातुन समाधीत जायचे, परंतु शरीरात परत न येणे म्हणजे निर्बीज समाधी. उदा.- संत ज्ञानेश्वर
सबीज समाधी - सबीज म्हणजे शरीरासोबत. बीज म्हणजे शरीर. शरीरातून समाधीत जायचं. समाधीचा आनंद घ्यायचा आणि शरीरात (बीज) परत यायचे. योगाचे अंतिम उद्दिष्ट सबीज समाधी.
समाधीत योगी ध्यानात एवढा एकरुप झालेला असतो की त्याचे अस्तित्व जणू काही शून्य झालेले असते.
समाधीचा साधनेचा दिर्घकाळ अभ्यास केल्यावर एखादा योगी कदाचित दिवसभर समाधी अवस्थेत राहू शकेल.