यम, नियम, आसन आणि प्राणायाम ही योगाची चार बहिरंग समजली जातात. तर धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची अंतरंग समजली जातात.
बहिरंगातुन अंतरंगात प्रवेश करण्यसाठी प्रत्याहाराच्या दारातुन जावे लागते. यम, नियम, आसन व प्राणायामानंतर प्रत्याहाराचे पालन करावे म्हणजे योगी अष्टांग योगाच्या पुढच्या पायरीवर म्हणजे धारणेकडे वाटचाल करतो.
प्रत्याहार म्हणजे आपल्या इंद्रियांनी त्यांच्या विषयाकडे धाव न घेणे, आपली जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत. त्यांच्यावर वश करणे म्हणजे प्रत्याहार होय. इंद्रीयांचे नियंत्रण मनावर असते. इंद्रीये व मन आपल्या विषयाकडे कार्याकडे मग्न असतात. या ऐवजी प्रत्याहार म्हणजे मनाने इंद्रीयांवर नियंत्रण करून त्यांना त्यांच्या कार्याकडे धावण्यापासून परावृत्त करणे. म्हणजेच प्रत्याहाराच्या अभ्यासाने पंचज्ञानेंद्रीय मनाला वश होतात. उदा. डोळयांनी चांगले गुलाबाचे फुल बघितले तर लगेच मनामध्ये वेगवेगळे विचार येतात. किती छान फुल आहे. आकार छान आहे. रंग छान आहे. इ. मन लगेच तिकडे वळते. प्रत्याहारातुन आपल्याला हया डोळयांच्या कार्याकडे / विषयाकडे स्वतःहुन दुर्लक्ष करायचे. म्हणजे मनात कुठलेही विचार येणार नाही.
असेच आपल्याला इतर इंद्रीयांविषयी करायचेय. म्हणजेच प्रत्याहाराचा अभ्यास होऊन योगी बहिरंगातुन अंतरंगात प्रवेश करु शकेल.