मुद्रा प्राणायाम
अ) चिनमुद्रा प्राणायाम :- वज्रासनात बसावे
१) अंगठा व तर्जनी एकमेकांचे टोक एकमेकांशी जोडलेले असावे . त्यावर थोडासा दाब असावा .आता उरलेली तीन बोटे एकमेकांशी जोडलेली व सरळ राहावीत. हात मांडीवर मध्यरेषेत पालथे ठेवावेत व खांदे सैल सोडावेत .
२) हातांचे कोपरे पोटाच्या बाजूला चिकटलेल्या स्थितीत व शरीर व मान सैल अशा स्थितीत बसावे.
३) या स्थिती बसल्यानंतर पुरक(श्वास घेणे): कुंभक (घेतलेला श्वास रोखून ठेवणे ) : रेचक ( सावकाश श्वास सोडणे) : शून्यक (श्वास सोडल्या नंतर तसेच निष्क्रिय राहणे) अशा क्रमाने हा प्राणायाम ४:२:५:२ (सेकंद) या प्रमाणात सात वेळा करावा.एका वेळी अशी सात आवर्तनाने करावीत .
ब) चिन्मयी मुद्रा परणायाम :- वज्रासनात बसावे
१) अंगठा व तर्जनी एकमेकांस जोडून वर्तुळ तयार करा व यात अंगठ्याचे तर्जनीचे टोक एकमेकांशी जोडलेले असावे .आता उरलेली तीन बोटे पेरांमध्ये दुमडून आतल्या बाजूस वळवून दाबून ठेवावेत .
२) उपरोक्त स्थितीतील तळवे मांडीवर पालथे /मध्यरेषेत ठेवा व कोपरे पोटाच्या बाजूला चिटकलेल्या स्थितीत व खान्दे सैल अशा स्थितीत असावे .
३) या स्थिती बसल्यानंतर पुरक(श्वास घेणे): कुंभक (घेतलेला श्वास रोखून ठेवणे ) : रेचक ( सावकाश श्वास सोडणे) : शून्यक (श्वास सोडल्या नंतर तसेच निष्क्रिय राहणे) अशा क्रमाने हा प्राणायाम ४:२:५:२ (सेकंद) या प्रमाणात सात वेळा करावा.एका वेळी अशी सात आवर्तनाने करावीत .
क) आदिमुद्रा प्राणायाम :- वज्रासनात बसावे
१) दोन्ही हातांचे अंगठे दुमडून करंगळीच्या तळाशी ठेवा व मूठ बंद करा.
२) उपरोक्त स्थितीला हाताची मूठ पालथी मध्यरेषेत मांडीवर ठेवा हाताचे कोपरे पोटाच्या बाजूला चिटकलेल्या स्थितीत व खांदे सैल अशा स्थितीत बसा.
३) या स्थिती बसल्यानंतर पुरक(श्वास घेणे): कुंभक (घेतलेला श्वास रोखून ठेवणे ) : रेचक ( सावकाश श्वास सोडणे) : शून्यक (श्वास सोडल्या नंतर तसेच निष्क्रिय राहणे) अशा क्रमाने हा प्राणायाम ४:२:५:२ (सेकंद) या प्रमाणात सात वेळा करावा.एका वेळी अशी सात आवर्तनाने करावीत .
ड) मेरुदंड रुद्र प्राणायाम :- वज्रासनात बसावे
१) हाताची चारही बोटे तळहातास दुमडलेली व दोन्ही हाताचे अंगठे सरळ आकाशाकडे करा.
२) उपरोक्त स्थितीतील मूठ मांडीवर मध्यरेषेत उभ्या स्थितीत ठेऊन अंगठे शरीराकडे ताणलेल्या स्थितीत राहतील असे ठेवा. कोपरे पोटाच्या बाजूला चिटकलेल्या स्थिती व खांदे सैल अशा स्थित बसा.
३) या स्थिती बसल्यानंतर पुरक(श्वास घेणे): कुंभक (घेतलेला श्वास रोखून ठेवणे ) : रेचक ( सावकाश श्वास सोडणे) : शून्यक (श्वास सोडल्या नंतर तसेच निष्क्रिय राहणे) अशा क्रमाने हा प्राणायाम ४:२:५:२ (सेकंद) या प्रमाणात सात वेळा करावा.एका वेळी अशी सात आवर्तनाने करावीत .
इ) पूर्ण मुद्रा प्राणायाम :- वज्रासनात बसावे
१) दोन्ही हातांचे अंगठे दुमडून करंगळीच्या तळाशी ठेवा व मूठ बंद करा.
२) दोन्ही मुठी एकमेकांशी आतल्या बाजूने जोडून घ्या .दोन्ही मुठी वरच्या बाजूला व पोटाला चिटकून मांडीवर ठेवा .
३) उपरोक्त स्थितीतील मुठीची जोडी छातीपासून शरीराशी घासत जांघेजवळ ठेवा .आता त्याला खालील बाजूस दाब द्या .जेणेकरून खांदे वर उचलले जातील व दोन्ही हात जास्तीत जास्त सरळ स्थितीत राहतील असे बसावे.
४) या स्थिती बसल्यानंतर पुरक(श्वास घेणे): कुंभक (घेतलेला श्वास रोखून ठेवणे ) : रेचक ( सावकाश श्वास सोडणे) : शून्यक (श्वास सोडल्या नंतर तसेच निष्क्रिय राहणे) अशा क्रमाने हा प्राणायाम ४:२:५:२ (सेकंद) या प्रमाणात सात वेळा करावा.एका वेळी अशी सात आवर्तनाने करावीत .