अनुलोम विलोम प्राणायाम

१) डाव हात मांडीवर पालथा ठेवा

२) उजव्या हाताने प्रणवमुद्रा बांधा व छातीला चिकटवून ठेवा.

३) उजव्या नाकपुडीवर अंगठा ठेऊन ती नाकपुडी बंद करा व डाव्या नाकपुडीने श्वास हळुवार आत घ्या .

४) आता डावी नाकपुटी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास संथ गतीने ,हळुवार बाहेर सोडा .(श्वास सोडताना नाकासमोर डोरा किंवा मोराचे पीस धरले तरी ते हलणार नाही इतक्या संथ गतीने सोडावा. )

५) आता उजवी नाकपुडीने श्वास संथ गतीने ,हळुवार आत घ्या व उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने साथ गतीने श्वास सोडा.

६) हा प्राणायाम साधारणतः ३ ते ५ मिनिटापर्यंत करावा.या कालावधीत साधारणतः २० ते २५ इतकी आवर्तने होतील.

७) हि क्रिया थांबविताना डाव्या नाकपुडीने श्वास सोडूनच क्रिया थांबवावी.

८) या क्रियेमध्ये श्वास घेताना किंवा सोडताना कोणत्याही प्रकारचा आवाज करू नये .

९) प्रमाण १:2