भ्रामरी प्राणायाम

भ्रामरी प्राणायाम

१) दोन्ही अंगठे कानामध्ये ,पहिले बोट(तर्जनी) डोळ्यांवर, मधले बोट नाकाच्या डोळ्याजवळील हाडावर, तिसरे बोट वरच्या ओठावर आणि करंगळी खालच्या ओठावर ठेवा. (षण्मुखी मुद्रा )

२) कंठाचे आकुंचन करत नर भुंग्याप्रमाणे आवाज करत दीर्घ श्वास घ्या.यालाच भ्रामरी पूरक म्हणतात.

३) सर्व बोटांचा हलका दाब द्या.

४) भ्रामरी रेचक करताना ओंकारातील  मकार म्हणत मादीच्या भुंग्याप्रमाणे आवाज करत श्वास लांबवत सोडा.

५) हा प्राणायाम साधारणतः ३ ते ५ मिनिटापर्यंत करावा.या कालावधीत साधारणतः ७ ते १० इतकी आवर्तने होतात.

६) डोळे बंद असावेत.

७) प्रमाण १:२, पूरक १:रेचक २.