विभागीय प्राणायाम

विभागीय प्राणायाम

अ) कनिष्ठ विभागीय प्राणायाम : वज्रासनात बसावे 
१)  दोन्ही हातांचे तळवे ताठ करून चार बोटे जुळवा व अंगठा ९० अंशाच्या कोना मध्ये करा .
२) आता दोन्हीहात बरगड्याच्या शेवटच्या फासळीच्या खाली जमिनीला समांतर ठेवा .तळवे जमिनीला समांतर राहण्यासाठी करंगळीकडे भाग उचला .
३) या स्थितीत शरीराला अंगठा व तर्जनीचाच स्पर्श आवश्यक आहे .त्यासाठी हाताचे दोन्ही कोपरे पुढच्या बाजूला वाळवावेत .या स्थितीत कोपराच्या ठिकाणी आलेला ताण हितकारक आहे.
४) या स्थितीत बसल्यानंतर पूरक : कुंभकः रेचकः श्यूनक अशा क्रमाने हा प्राणायाम ४:२:५:२ या प्रमाणात सात वेळा करावा.

ब)मध्यम विभागीय प्राणायाम : वज्रासनात बसावे 
१) दोन्ही हातांचे अंगठे काखेमध्ये जास्तीत जास्त वरच्या बाजूस व इतर जुळवलेली चार बोटे जमिनीस समांतर राहतील या स्थितीत तर्जनीचा स्पर्श छातीवर व अंगठा बगलेत राहील.
२) या स्थितीत शरीराला तर्जनीचाच स्पर्श आवश्यक आहे.हाताचे कोपरे जमिनीस समांतर राहतील .या स्थितीत कोपराच्या ठिकाणी आलेला ताण  हितकारक आहे.
३) या स्थिती बसल्यानंतर पुरकःकुंभकः रेचकः शून्यकः अशा क्रमाने हा प्राणायाम ४:२:५:२ या प्रमाणात सात वेळा करावा.एका वेळी अशी सात आवर्तनाने करावीत .

क) ज्येष्ठ विभागीय प्राणायाम : वज्रासनात बसावे
१) आधी मान खाली वाकवा व हनुवटी छातीला टेकवा .
२) गुडघ्यावर ठेवले दोन्ही हात सरळ वर न्या.आता हाताचे तळवे पाठीच्या दिशेला करा व हळूहळू खाली वाकवत पाठीच्या फऱ्यावर मानेजवळ टेकवा.तळवे एकमेकांवर येऊ देऊ नयेत .अलगच राहावेत .
३) दोन्ही हाताच्या दंडाचा दाब डोक्याच्या मागे द्या .(दोन्ही दंडांमध्ये डोके असावे)
४) हनुवटी न उचलता छाती पुढे काढा .
५) या स्थितीत दंडाचा दाब व हनुवटी छातीत टेकल्यामुळॆ मानेला आलेला ताण हितकारक आहे .
६) या स्थितीत बसल्यानंतर  पुरकःकुंभकः रेचकः शून्यकः अशा क्रमाने हा प्राणायाम ४:२:५:२ या प्रमाणात सात वेळा करावा.